सिंगापूर : सिंगापूरमधील एका चिनी टॅक्सी चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये टॅक्सीचालक वांशिक शेरेबाजी करताना दिसत आहे. हा टॅक्सीचालक महिला प्रवाशाला म्हणाला, तुम्ही भारतीय आहात आणि मी चिनी आहे. तुम्ही भारतीय सर्वात वाईट ग्राहक आहात. ऑनलाइन टॅक्सी बूक करताना महिलेने चुकीची माहिती लिहिली होती. त्यामुळे चालक आणि प्रवाशात बाचाबाची झाली. दोघांमध्ये वाद सुरू असताना प्रवासी महिलेने या घटनेचा व्हिडीओ चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला असल्याचे सांगण्यात येत आहे
टॅक्सी चालकाने महिलेवर वांशिक शेरेबाजी सुरू केली. त्यामुळे महिलेने दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ चित्रीत केल्याचे प्रवासी महिलेने म्हटले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेनेला होइडन नावाची महिला सिंगापूरमध्ये टॅक्सीने प्रवास करत होती. या प्रवाादरम्यान तिचा टॅक्सी चालकाशी वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत महिलेने म्हटलं आहे की, मी अॅपवर चुकीची माहिती अपडेट केली होती. त्यामुळे टॅक्सीचालक माझ्यावर संतापला आणि त्याने माझ्यावर वांशिक शेरेबाजी केली.
View this post on Instagram
टॅक्सी चालक मला म्हणाला, “तुम्ही भारतीय आहात ना? मी चिनी आहे, लोकांना माहिती आहे की तुम्ही भारतीय आहात आणि मी चिनी आहे. तुम्ही सर्वात वाईट ग्राहक आहात. तुम्ही भारतीय मुर्ख आहात.” असे त्याने म्हटल्याचा आरोप तिने केला आहे.
खरंतर ती महिला भारतीय नागरिक नाही. तिने सांगितलं की ती सिंगापूर-युरेशियन आहे. टॅक्सीचालकाच्या वांशिक शेरेबाजीनंतर ती महिला म्हणाली मी सिंगापूर-भारतीयदेखील आहे. पण तुम्ही जातीयवादी आहात. हा टॅक्सीचालक महिलेवर वांशिक शेरेबाजी करून थांबला नाही. त्याने या महिलेच्या ९ वर्षांच्या मुलीवरही कमेंट केली.
हा टॅक्सी चालक त्याच्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत म्हणाला तुमची मुलगी १.३५ मीटरपेक्षा उंच नाही. माझ्याशी वाद घालू नका, तुमची मुलगी १.३५ मीटरपेक्षा बुटकी आहे. यावर महिला म्हणाली, माझी मुलगी १.३७ मीटर उंच आहे.असा त्यांचा संवाद या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांच्यातील वांशिक शेरेबाजीचा व्हिडीओ सध्या शोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.