मुंबई – उर्वशी रौतेलाला बॉलीवूडमधील सर्वांत लहान वयाची ऍक्ट्रेस असून, उर्वशीने आपल्या कष्टाने बॉलीवूडमधील आपले स्थान पक्के केले आहे. डान्स स्कील आणि अभिनयाच्या जोरावर ती सध्या खूप बिझी आहे. सतत चालणाऱ्या शूटिंगमधून वेळ काढून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स देखील आहेत.
सोशल मीडियावर उर्वशीचा मोठा चाहता वर्ग असून, फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला प्रचंड पसंती देतात. नुकतंच उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच संतापले असून, अनेकांनी तिला ट्रोल सुद्धा केलं आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये ती एका शोमध्ये केक कापताना दिसत आहे. खरंतर आपण सगळेजण चाकूने केक कापतो. पण उर्वशीने मात्र तलवारीने केक कापला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. स्वतः उर्वशीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
यावेळी उर्वशीने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने हातात ग्लोज घातले आहेत. तसेच हाय पोनी आणि ग्लॅमरस मेकअपने उर्वशीने सर्वांची मने जिंकली आहेत. उर्वशीचा हा लूक देखील चर्चेत आहे. तिच्या या ड्रेसची किंमत तब्बल पंधरा लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.