नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रस्त्यावरील एका भटक्या गर्भवती कुत्र्याची विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या कुत्र्याला बेदम मारहाण करून ठार केले आहे. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याप्रकरणी दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिव्या पुरी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील सुखदेव विहार भागातील आहे. दिव्या न्यू फ्रेंड्स कॉलनीत राहते. त्यांनी डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पसमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्यासोबत अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी या संदर्भातील व्हिडीओ देखील पोलिसांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी कुत्र्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच कुत्रा मेल्यानंतरही या विद्यार्थ्यांचे अत्याचार थांबले नाहीत त्यांनी त्या कुत्र्याचे पाय ओढत संपूर्ण मैदानात फिरवले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Group of 20 students of Don Bosco technical institute Zakir nagar killed a pregnant dog ,no action taken till now @DCPSEastDelhi @CPDelhi pic.twitter.com/JM1ten2Oyz
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) November 19, 2022
याप्रकरणी भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचे 3 व्हिडिओ शेअर केले आहेत.त्यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की,”ज्या रस्त्यावरच्या कुत्र्यासोबत क्रौर्य केले गेले ती गरोदर होती,”असे त्यांनी म्हटले आहे.
तेजिंदर पाल सिंग बग्गा पुढे म्हणाले की, “ती (रस्त्यावरची कुत्री) मदतीसाठी ओरडत होती. दरम्यान कोणीतरी त्याला मारण्यास सांगितले. त्याला मारल्यानंतर कुत्र्याचा मृतदेहही शेतात ओढून नेला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी विनंतीही बग्गा यांनी केली आहे. बग्गा यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्राणी हक्क कार्यकर्ते विजय भारती यांनी जाकीर नगर येथील तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.