मुंबई – अभिनेता अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली होती यानंतर काहींनी चित्रपटाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका कर्त्यांची याचिका फेटाळली असून अजय देवगनाला मोठा दिलासा दिला आहे.
श्री चित्रगुप्त वेलफेयर ट्रस्टने न्यायालयात धाव घेत अजय देवगणच्या या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली होती. चित्रपटात चित्रगुप्तांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचे आरोप यावेळी करण्यात आला होता. तसेच चित्रपटाचे पोस्टर आणि युट्युबवरील सर्व व्हिडीओ हटवण्याची मागणी याचिका कर्त्यांनी केली होती. परंतु चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता.
न्यायालयात सुनावणी वेळी चित्रपट प्रदर्शित होऊन गेला असल्याचे समोर येताच ही याचिका फेटाळण्यात आली. या याचिकेत अजय देवगन, सेंसर बोर्ड, डायरेक्टर इंद्र कुमार, प्रोड्यूसर भूषण कुमार,सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने अजय देवगणसह इतर कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.