श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे अगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून “विक्रम’ लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावुक झालेल्या इसरो चीफ के सिवन यांना गळाभेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मोदींनी के सिवन धीर देत रात्रदिवस काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे देश कौतुक करत आहे. सर्व देश तुमच्या पाठिशी उभा आहे. असेही ते म्हणाले आहे.
मोदींनी भावुक इसरो प्रमुखांना दिला धीर#म #मराठी #Chandrayan2 #Chandrayan2landing #ISROMissions #ISRO #ISROscientist pic.twitter.com/mO7QbcSsd1
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 7, 2019
#WATCH PM Narendra Modi hugged and consoled ISRO Chief K Sivan after he(Sivan) broke down. #Chandrayaan2 pic.twitter.com/bytNChtqNK
— ANI (@ANI) September 7, 2019