नवी दिल्ली – दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. एकीकडे भारत होळीच्या रंगात रंगला आहे, तर दुसरीकडे भारतासह संपूर्ण जग बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे. महिला दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नारी शक्तीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार महिलांच्या पप्रगतीसाठी सक्षम असल्याचे म्हणत एक खास ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतात,”आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीला ट्रिब्यूट.. भारताच्या प्रगतीत महिलांच्या भूमिकेचा आम्ही खूप आदर करतो. आमचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी सदैव काम करत राहील” यासह पंतप्रधानांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
On International Women’s Day, a tribute to the achievements of our Nari Shakti. We greatly cherish the role of women in India’s progress. Our Government will keep working to further women empowerment. #NariShaktiForNewIndia pic.twitter.com/giLNjfRgXF
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिनाची नेमकी केव्हा झाली
आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. 1917 हे वर्ष रशियन महिलांनी रोटी आणि शांततेच्या मागणीसाठी केलेल्या निषेधांसह होते. या विरोधामुळे तत्कालीन रशियन झारला सत्ता सोडावी लागली. मध्यंतरी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकारही दिला. ज्या दिवशी रशियन महिलांनी ही कामगिरी सुरू केली तो दिवस रशियन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी (रविवार) होता. जर ही तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार पाहिली तर तो दिवस 8 मार्च होता. तेव्हापासून या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिन असे नाव देण्यात आले.