मुंबई – नेहमी वैविध्यपूर्ण कथा, विषय मांडणारे अशी लेखक-दिग्दर्शक ‘महेश मांजरेकर’ यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी सिनेव्यवसायाची गरज म्हणून व्यावसायिक सिनेमे बनवले; पण समाजातील वास्तविकता पडद्यावर प्रतिबिंबित करणारे मार्मिक सिनेमेही त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केले.
आता पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवणारा एक सिनेमा ते घेऊन येत आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच, दि. १४ जानेवारी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमातील काही दृश्यांवर टीका झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. आणि याच मुद्द्यावरून हा वाद सुरु झाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हा वाद सुरु असला तरी सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. मांजरेकर यांनी एक पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
“मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या कुत्र्यांना भिडणार दोन लांडगे. काँक्रीटच्या जंगलात राडा सुरु होणार फक्त २ दिवसांत! तिकीट बुकिंग सुरू झालंय, दम असेल तर याच थेटरात.’ असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.
हा सिनेमा दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित असून सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे.