malaika arora – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ (malaika arora) जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या हटके लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे.
नुकताच मलायका अरोरा ही रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसून आली होती. पण यावेळी जरा वेगळंच घडलं आणि त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल देखील होत आहे. व्हिडीओमध्ये मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत नाही तर, अभिनेता शोएब इब्राहिम याच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
रिऍलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगत असते. नुकताच अभिनेत्री दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर मलायका हिने 100 टक्के लग्न करणार असं उत्तर दिलं. म्हणून 2024 मध्ये मलायका लग्न बंधनात अडकणाक का? अशा देखील चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
दरम्यान, नुकतंच मलायका अरोराचा पहिला पती अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. अरबाज याने मेकअर आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलंय. दोघांच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ-फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.