Indian Origin Couple Found Dead In US – अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाचे जोडपे आणि त्यांची मुलगी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहे. हे प्रकरण घरगुती हिंसाचाराशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुटुंब त्यांच्या 5 मिलियन डाॅलरच्या (भारतीय रुपये – 41 कोटी 50 लाख जवळपास) बंगल्यात मृतअवस्थेत आढळले आहेत. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे. राकेश कमल (वय 57 ), पत्नी टीना (वय 54) आणि त्यांची मुलगी एरियाना (वय 18) यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या डोव्हर हवेलीत सापडले असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
डोव्हर शहर मॅसॅच्युसेट्सची राजधानी बोस्टनच्या नैऋत्येस सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे. टीना आणि तिचे पती पूर्वी एडुनोव्हा नावाची एक शिक्षण प्रणाली कंपनी चालवत होते. जिल्हा अधिकाऱ्यांनी या मृत्यू प्रकरणाला घरगुती हिंसाचाराचे प्रकरण म्हटले आहे. राकेशच्या मृतदेहाजवळ एक बंदूक सापडल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, कुटुंबातील तिन्ही सदस्यांची गोळ्या झाडून कोणी हत्या केली हे उघड झालेले नाही, अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल –
जिल्हा ऍटर्नी मॉरिसे म्हणाले की, ही घटना हत्या की आत्महत्या आहे, असे घोषित करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीच्या अहवालाची वाट पाहत आहोत, लवकरच अहवाल अपेक्षित आहे. ऍटर्नी यांनी मृत्यूमागील कारणाबाबत अंदाज लावण्यास नकार दिला. ऑनलाइन रेकॉर्डवरून हे जोडपे गेल्या अनेक वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात होते. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही बातमी मिळाली नाही, तेव्हा नातेवाईक त्यांची विचारपूस करण्यासाठी घरी पोहोचले आणि त्यानंतरच त्यांच्या मृतदेहाची माहिती मिळाली.
“हे दुर्दैवी आहे, कुटुंबाप्रती आम्ही शोक व्यक्त करतो.”
ऍटर्नी मॉरिसे म्हणाले की, याआधी त्यांच्याविरुद्ध कोणताही पोलिस अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. घरगुती समस्या देखील नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यामध्ये कोणताही वाद नव्हता. मॉरिसे यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेबाबत शोक व्यक्त करत आहोत.” कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत, मॉरिसे म्हणाले की, नातेसंबंधांमध्ये लोकांना जाणवणारा काही ताण सुट्टीच्या दिवसांत समोर येतो. हत्येचा तपास चालू आहे. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. यावेळी उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून कोणताही बाह्य सहभाग सूचित होत नाही, घरगुती हिंसाचार ही अत्यंत घातक घटना आहे.