काबुल – अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे. अफगाणिस्तान सोडण्याच्या आशेने विमानतळावर पोचणाऱ्या महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्या मदतीसाठी अमेरिकन सुरक्षा रक्षकांकडे रडून रडून मदत मागत आहे. दरम्यान,महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर जमले आहे.
US troops take a baby over the wire into the secure area of Kabul Airport, #Afghanistan.
Troops on the ground are having to deal with some truly challenging conditions they probably never expected to ever experience.
As a father, this breaks my heart. What a world we live in. pic.twitter.com/qDsWLvYj7c
— Alex Tiffin (@RespectIsVital) August 19, 2021
अशातच पुन्हा एकदा मन सुन्न करणारा एक व्हिडियो समोर आला आहे. या व्हिडियोमध्ये महिलेने आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी सैनिकाकडे सोपवलं आहे. व्हायरल व्हिडियोमध्ये काबुल विमानतळावर आपल्या मुलाला वाचविण्यासाठी एक कुटूंबाने त्यांचा बाळा अँरिकां सैनिकांकडे सोपवले. आई-वडिलांनी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकाकडे मदती मागितली. त्यावेळी एका सैनिकाने ताऱ्यांच्या कुंपणावरुन खाली झुकून त्यांचा बाळाचा उचलून घेतलं. हे पाहून घटनास्थळावरील सैनिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दरम्यान,महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर जमले आहे. सगळीकडे आरडा-ओरडा सुरू होता. एकच गोंधळाची परिस्थिती होती.