मुंबई – दक्षिण भारतातील “पुष्पा द राइज’ लवकरच रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर आज अजय देवगणने रिलीज केला. यामध्ये दक्षिणेतील हिट हिरो अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे लीड रोलमध्ये असणार आहेत.
दाक्षिणात्य सिनेमा असला तरी हा एक पॅन इंडिया फिल्म असणार आहे. त्यामुळे तेलगू बरोबर हिंदीतही रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दोन भाग असणार आहेत.
यातील “पुष्पा पार्ट 1- द राइज’ 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चंदनाच्या लाकडांच्या तस्करीच्या कथेवर या सिनेमाची कथा आधारलेली असणार आहे. आंध्र प्रदेशातील सेशाचलम जंगलात ही कथा घडते आहे.
मूळ तेलगू सिनेमात मल्याळम सिनेमातील प्रसिद्ध ऍक्टर फहाद फासिल हे खलनायकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. तेलगूतील हा त्यांचा पहिला सिनेमा असणार आहे.
रश्मिका मंदाना पहिल्यांदाच अलू अर्जुनबरोबर काम करणार आहे. थेट हिंदीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा रश्मिकाचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.
“पुष्पा’च्या बरोबर हॉलीवूडमधील “स्पायडर मॅन-नो वे होम’ रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सिनेमांची शर्यत बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे.