मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘नेहा कक्कड’ने जगभरातील अनेक गायकांना आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने धोबी पिछाड दिला आहे. नेहाने आता एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून उभारी घेतली असून जगभरातील लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.
नेहाने तिच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केलं आहे. त्याला ती अजूनही विसरलेली नाही. नेहा बऱ्याचवेळा तिच्या लहानपणीच्या स्ट्रगल विषयी बोलली आहे. नेहाने बहीण सोनू कक्करसोबत गाणं गायला सुरुवात केली होती. दरम्यान, नेहा बऱ्याचवेळा गरिबांना मदत करताना दिसते, पण यावेळी मदत करायला गेलीली नेहा चांगलीच अडचणीत सापडली आहे.
View this post on Instagram
सध्या नेहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामध्ये नेहा गरजू लोकांना तब्ब्ल ५००-५००च्या नोटा वाटताना दिसत आहे. यावेळी नेहाला पैसे वाटताना पाहून अनेक लोक तिच्या गाडीजवळ जमा झाले. आणि पैसे घेण्यासाठी झुंबड उडाली.
यानंतर काहींनी पैसे घेण्यासाठी हात पुढे घेतले यावेळी काहीशी झपटाझपटी झाली. हा सगळा गोंधळ पाहून नेहा घाबरली कारमध्ये मागे सरकली व कारची काच बंद करून तिथून निघून गेली. आणि याच वरून नेहाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून, काहींनी नेहाचं कौतुक सुद्धा केलं आहे.