विकी कौशल आपल्या आगामी “द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या बहुचर्चित सिनेमाबद्दल खूप चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर सिनेमाच्या तयारीचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.
लॅपटॉपवर त्याच्या चेहऱ्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे.
या व्हिडिओला बॅकग्राऊंडमध्ये एक म्युजिकदेखील दिलेले आहे. या व्हिडिओनंतर विकीने एक फोटोदेखील शेअर केला आहे.
त्यामध्ये तो एक पुतळ्याशेजारी उभा राहून पोज देताना दिसतो आहे. “आता अमर होण्याची तयारी’असे त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
“अश्वत्थामा’मध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान लीड रोलमध्ये दिसणार आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
हा सिनेमा पुढच्यावर्षी एप्रिलमध्ये रिलीज करण्याचे नियोजन आहे. याशिवाय तो मेघना गुलजार दिग्दर्शित “सॅमबहाद्दूर’मध्ये देशाचे पहिले फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचाही रोल करणार आहे.