पुणे – करोना प्रतिबंधक लसींचे सोमवारी केवळ कोवॅक्सीनचेच डोस उपलब्ध आहेत. याशिवाय, दुसऱ्या डोसबरोबरच 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना याचा पहिला डोसही मिळणार आहे.
18 ते 44 वर्षे वयापर्यंत नागरिकांना सोमवारी लसीच्या उपलब्ध साठ्यांपैकी 40 टक्के लस आणि वयवर्षे 45 पुढील नागरिकांना उपलब्ध लसींच्या साठ्यापैकी 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकींगद्वारे पहिला डोस मिळणार आहे. तसेच उपलब्ध साठ्यापैकी 20 टक्के लस ही 18 ते 44 वर्षापर्यंत आणि 20 टक्के लस ही 45 वर्षे वयापुढील नागरिकांना 6 जून आणि त्यापूर्वी कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, अशांना दुसरा डोस मिळू शकणार आहे.
यासाठीचे ऑनलाइन स्लॉट बुकींग सोमवारी सकाळी आठ वाजता ओपन होणार आहे. प्रत्येक केंद्रांवर 200 डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.
येरवड्यातील स्व. राजीव गांधी रुग्णालय, कर्नल यंग शाळा, कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार रुग्णालय, सिंहगड रस्त्यावरील कै. बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय, गाडीखाना, कै. मालती काची रुग्णालय, मुंढवा येथील कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, ससून रुग्णालय या केंद्रांवर लस मिळणार आहे.