बारामती (प्रतिनिधी) – गांधीवादी विचारांचे जेष्ठ स्वतंत्रसेनान शंकरराव पांडुरंग रणदिवे (कसबा,रा.माळेगांव रोड, बारामती) यांचे ९८ व्या वर्षीवृध्दापकाळामुळे आज पहाटे दुःखद निधन झाले.
इंग्रजांच्या काळात १९४२ च्या लढ्यात सहभाग घेतला होता. यात सहा महिण्याची जेल आणि चापक्यांचे फटके अशी शिक्षा भोगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. बारामती काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार त्यांनी यापूर्वी पाहिला होता.