बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. समीरा सतत आपल्या कुटुंबीयांसोबतचे फनी व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिने आपली मुलगी नायरासोबतच असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यात समीराने आपल्या मुलीच्या ऍक्टिंग डेब्यूबाबत सांगितले आहे.
यात नायरा ही राशिची भूमिका साकारताना दिसत आहे. नायरा आणि हिमेश रेशमियाचा हा व्हिडिओ शेअर करत समीराने पोस्ट केले की, राशीच्या भूमिकेत नायराचे ऍक्टिंग डेब्यू चर्चेत आहे. ाशीीूारार ञ्चशवळीं ञ्चोश्रळषश. या व्हिडिओत हिमेश कोणत्या तरी कंटेस्टेंटची स्तुती करत आहे, ज्याला समीराने ट्विस्ट करत नायरासोबत जोडले आहे. हा व्हिडिओ मजेशीर असून तो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
याला आतापर्यत लाखोंच्या संख्येने पाहण्यात आले असून अनेकांनी तो री-शेअर केला आहे. यावर असंख्य कमेंटस् येत असून नायराच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, नेपोटिझमवर झालेल्या वादाबाबत विचारे असताना समिराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तीन चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.