नवी दिल्ली – देशात करोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वेगात ऑक्सिजनची वाहतूक होण्याची गरज वाढली आहे. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परमिटची गरज नसल्याचे सांगितले आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑक्सिजन सिलिंडर किंवा टॅंक राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य वाहतूक करताना परमीट लागणार नाही. ही सवलत 31 मार्च 2021 पर्यंत देण्यात आली आहे. बऱ्याच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता ही उपाययोजना करण्यात आली आहे.