- दिवाळीमुळे मागणीही अत्यल्प : पुरवठाही कमीच
- आवक वाढल्याने मटार आणि शेवगाही स्वस्त
पुणे – दिवाळीमुळे मार्केट यार्डात फळभाज्यांना अत्यल्प मागणी आहे. त्या तुलनेत आवकही कमी झाली आहे. त्यामुळे मटार, शेवगा वगळता सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आवक वाढल्याने मटार आणि शेवगाच्या भावात मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे.
येथील बाजारात रविवारी (दि. 15) 70 ते 75 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये जबलपुर येथून 3 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात येथून येथून कोबी 3 ट्रक, बेळगाव येथून 50 गोणी भुईमूग शेंग, तामिळनाडू येथून 2 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 2 टेम्पो गाजर आणि मध्यप्रदेश येथून लसणाची 2 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले 700 ते 800 पोती, कोबी 4 ते 5 ट्रक, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, तांबडा भोपळा 4 ते 5 टेम्पो, टॉमेटो 3 ते 4 हजार पेटी, कांदा जुना 25 ते 30 ट्रक, नवीन 2 गाड्या, आग्रा, इंदौर व स्थानिक भागांतून 30 ट्रक बटाटा इतकी इतकी आवक झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव –
कांदा : नवीन 300-450, जुना 300-500, बटाटा : 300-450, लसूण : 500-1100, आले : सातारी 150-250, भेंडी : 200-300, गवार : 400-500, टोमॅटो : 200-220, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 80-100, चवळी : 250-300, काकडी : 80-100, कारली : हिरवी 200-220, पांढरी 150-160, पापडी : 350-400, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 160-200, कोबी : 200-250, वांगी : 300-400, डिंगरी : 200-250, नवलकोल : 120-140, ढोबळी मिरची : 300-400, तोंडली : कळी 300-400, जाड : 150-160, शेवगा : 700-800, गाजर : 400-500, वालवर : 350-400, बीट : 300-400, घेवडा : 300-400, कोहळा : 200-250, आर्वी : 100-120, घोसावळे : 140-150, ढेमसे : 200-250, पावटा : 400-500, भुईमूग शेंग : 400-500, मटार : 800-1000, तांबडा भोपळा : 80-100, सुरण : 200-220, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.