लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ शरीफ यांनी आरोप केला आहे की, तुरुंगात असताना प्रशासनाने त्यांच्या बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता.
मरियम म्हणाल्या, चौधरी चिनी मिल केसमध्ये मागील वर्षी त्यांना तुरुंगात कैद केले होते तेव्हा तुरुंगामध्ये त्यांना अनेक संकटांचा आणि अडीअडचणींचा सामना करावा लागला. तुरुंगात त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
मरियम म्हणाल्या, मी दोन वेळा तुरुंगात गेले आहे. तुरुंगात जे जे घडले ते मी एक महिला असल्यामुळे सांगू शकत नाहीत.
चक्क बाथरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता, असा आरोप करून त्यांनी इम्रान खान सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहे.