कृष्णगीरी : तामिळनाडुतील कुख्यात दिवंगत चंदन तस्कर याची कन्या विद्या राणी हिने आज येथे भाजपच्यावतीने आयोंजित कार्यक्रमात त्या पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पी राधाकृष्णन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना गरीबांपर्यंत नेण्यासाठी आपण भाजप मध्ये प्रवेश करीत आहोत असे विद्या राणी हिने यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या अन्य असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजप मध्ये प्रवेश केला.