मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला होता.
यावेळी त्यांनी आपली पहिली यादी जाहीर करताना 8 उमेदवारांना संधी दिली होती. यानंतर आता आज (31 मार्च) आपली दुसरी यादी जाहीर करताना वंचितने 11 उमेदवारांना संधी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना 11 उमेदवारांना संधी दिली आहे. हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश बारस्कर,
साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.