पुणे – राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या उपाध्यक्षपदी पुणे येथील ऍड. राजेंद्र उमाप यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदी औरंगाबाद येथील वसंतराव साळुंके यांची निवड झाली आहे. 2 लाख 10 हजार वकील या संघटनेचे सभासद आहेत.
महाराष्ट्र, गोवा ही दोन राज्ये आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे दोन केंद्रशासित प्रदेश या संघटनेचे कार्यक्षेत्र आहे. बऱ्याच कालावधीनंतर पुणे येथील उपाध्यक्ष बनला आहे. ऍड. उमाप यांनी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम केले आहे.
वकिलांची सुरक्षितता, आरोग्य विषयक आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. बार कौन्सिलचे डिजिटलायझेशन करण्यावर भर असणार आहे. प्रत्येक बार असोसिएशनला बार कौन्सिलच्या योजना लवकरात लवकर माहित होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे.
नवीन वकील घडण्यासाठी बार कौन्सिलकडून पूर्ण क्षमतेने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बार कौन्सिलच्या वतीने 2020 पासून असलेल्या नवीन वकिलांचे मेडिक्लेम आणि अपघात क्लेम काढण्यात येत आहेत. ऍड. राजेंद्र उमाप, उपाध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा.