Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. अशात त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
साहेब मला माफ करा अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ‘ अखेरचा जय महाराष्ट्र…
साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलतांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले,’मी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मी सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. ‘ असं म्हणत ते येत्या दोन ते तीन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलतांना वसंत मोरे पुढे म्हणाले,’मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं’ अस म्हणत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
अशात लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. अशात पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवून खासदार होण्याची इच्छा त्यांनी आधीच व्यक्त केली आहे. आणि त्यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर चर्चेत आले होते. अशात पुणे लोकसभा मतदार संघातून मनसे नेते साईनाथ बाबर आणि वसंत मोरे इच्छूक उमेदवार होते.
Vasant More । वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट चर्चेत
तर नुकतीच वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी…! वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’
Parrot fever । पॅरोट फिव्हरमुळे ५ जणांचा मृत्यू, जाणून घ्या,काय आहे ‘हा’ आजार आणि कसा पसरतो ?