अक्षय कुमारच्या “बेल बॉटम’मध्ये वाणी कपूरही असणार आहे. ब्रिटनमध्ये लवकरच ती या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी आता आपल्याला दम धरवत नाही, असे तिने नुकतेच सांगितले.
‘बेल बॉटम’ची टीम आणि अक्षय कुमार यापूर्वीच स्कॉटलंडला जाऊन दाखल झाले आहेत. वाणी याच आठवड्यात या सगळ्या टीमला सामील होणार आहे. सिनेमाच्या सेटवर पुन्हा येण्यासाठी वाणी अगदी आतुर झाली होती. जवळपास पाच महिन्यांनंतर ती मुंबईच्या बाहेर पडणार आहे. लंडनच्या विमानात बसण्याची तिला खूपच घाई झाली आहे.
आयुष्यात पुन्हा एकदा शूटिंग करण्याचा अनुभव घेण्यास तिला आता मुळीच थांबायचे नाही आहे. करोनाच्या साथीमुळे थंडावलेल्या फिल्म इंडस्ट्रीच्या कामाला पुन्हा एकद सुरुवात होते आहे, त्याबद्दल तिला आनंद होतो आहे.
‘हे वर्ष आपणा सर्वांसाठीच अगदी परीक्षा बघणारे वर्ष ठरले आहे. मात्र आता सर्व परिस्थिती हळूहळू स्थिरस्थावर होत आहे, याचा आनंद वाटतो आहे.’ असे ती म्हणाली.
‘बेल बॉटम’साठी अक्षय कुमारची हिरोईन म्हणून वाणीची अगदी अलीकडेच निवड झाली. त्याच्या बरोबर काम करताना खूप शिकायला मिळेल, असे तिला वाटाते. अक्षय बरोबर काम करण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे.