शिरूर -शहरातील रामलिंग रस्त्यावर नरवीर तानाजी सोसायटी लगत पिकअप व दोन मोटारसायकलच्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर संबंधित पीकअप रस्त्याच्या कडेला उलटली. किशोर बाबुराव ठुबे (वय 57, रा. रामलिंग रोड, शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर ओंकार फक्कड लंघे जखमी झाले आहेत. याबाबत संतोष ठुबे यांनी खबर दिली.
सोमवारी (दि.31) दुपारी 2 वाजता रामलिंग रस्त्यावर नरवीर तानाजी सोसायटी लगत पिकअप जीप (एमएच 16 सीसी 5993) जात असताना दुचाकी (एमएच 12 केएम 4788) यांची धडक झाली. यात दुचाकीवरील ठुबे मृत झाले.