नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात सध्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे जाळे वाढवण्याचे काम भारतीय रेल्वे कडून जोरदार पद्धतीने सुरु आहे. जवळ जवळ आता प्रयेक राज्यामध्ये वंदे भारत ट्रेन धावायला लागली आहे. अशातच गोवा राज्यातही ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला आहे. येत्या 03 जून रोजी गोवा राज्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’ ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
03 जून रोजी मुंबईतील मडगाव येथून हि वंदे भारत ट्रेन रवाना होणार असून 7 तासांमध्ये गोवा येथे पोहोचणार आहे. सध्या सीएसएमटी ‘तेजस’ एक्स्प्रेस हि गोवा ते मुंबई असा प्रवास करते. या एक्स्प्रेस गोव्याला पोहोचायला 8 तास 40 मिनिटे लागतात. परंतु आता वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा अंतर फक्त 7 तासामध्ये पूर्ण करणार आहे.
दरम्यान, ‘वंदे भारत’ ट्रेन हि देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असून तिचा कमाल वेग 160 किमी/तास इतका आहे. हि ट्रेन ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून तयार केली असून त्यामध्ये 80% स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे.
तसेच या ट्रेन मध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट, स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजा आणि प्रत्येक कोचमध्ये चार आपत्कालीन दरवाजे अश्या अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात आला आहे.