बारामती – शहरातील जळोची येथील प्राथमिक शाळा कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रात 1 हजार 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून लवकरच 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी दिली.
जळोची येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रात 9 सप्टेंबर पासून जळोची लसीकरण सत्राचा प्रारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे यांच्या शुभहस्ते झाला.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,अजिंक्य सातकर,महेंद्र गोरे ,डाॅ नवनाथ मलगुंडे यांच्या प्रयत्नातून जळोची ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु आहे.जळोची परिसरातील नागरिकांसाठी लस उपलब्धतेनुसार लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. परिसरातील 1500 नागरिकांनी दि(9 ) सप्टेंबर 1 ऑक्टोंबर रोजी पर्यं लसीकरण करून घेतले आहे.
विशेष अभार बारामती शहरातील डाॅ.सदानंद काळे व डाॅ. हेमंत नाझीरकर,डाॅ.राजेंद्र चोपडे,डाॅ.संतोष शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे मासाळ यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे,अजिंक्य सातकर,महेंद्र गोरे,डाॅ नवनाथ मलगुंडे,यांच्या प्रयत्नातून लसीकरण करुण घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ,नगरसेवक अतुल बालगुडे,नगरसेविका आशाताई माने, उपनगराध्यक्ष बा.न.प अभिजीत जाधव,प्रताप पागळे,दिपक मलगुंडे,श्रीरंग जमदाडे,अँड.अमोल सातकर,शैलेश बगाडे,डाॅ.नवनाथ मलगुंडे,दत्तात्रय माने,सावता गोरे,प्रमोद ढवाण,धनंजय जमदाडे,गणेश पागळे, किरण शेंडगे,डाॅ.राजेंद्र चोपडे,डाॅ.संतोष शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.
“जळोची तील पंधराशे नागरिकांचे आत्तापर्यंत लसीकरण झाले आहे. उर्वरित नागरिकांनीदेखील लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बारामती शहरात जळोची येथे लवकरच 100% लसीकरण करण्याचा मानस आहे. नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे.” -किशोर मासाळ (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस)