महापालिकेत फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण कमी
पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्स तर दुसऱ्या टप्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 510 हेल्थ वर्कर्सपैकी 1 लाख 6 हजार 242 लाभार्थींना लस दिली. म्हणजेच लसीकरण 99.75 % उद्दिष्ट पूर्ण झाले. तर 88,738 फ्रंटलाइन वर्कर्सपैकी 81,605 जणांना लस देऊन 91.96 % लसीकरण झाले आहे.
पुणे ग्रामीण भागात उद्दिष्टापेक्षा 22% अधिक लसीकरण झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही उद्दिष्टापेक्षा 7% अधिक लसीकरण झाले.
तर पुणे मनपा हद्दीत 84% लसीकरण झाले. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये पुणे महापालिकेत केवळ 60% लसीकरण झाले.
ग्रामीण भागात तब्बल 181% लसीकरण झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये 92% लसीकरण झाले आहे.