‘या’ कलाकारांना मिळणार राज्य शासनाच व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार

मुंबई- चित्रपट सृष्टीत राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा ५६व्या राज्य मराठी पुरस्काराचे २६ मे रोजी नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे आयोजन काण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘व्ही.शांताराम’ जीवनगौरव पुरस्कार आणि ‘व्ही शांताराम’ विशेष योगदान पुरस्कार तसेच, ‘राज कपूर’ जीवनगौरव पुरस्कार व ‘राज कपूर’ विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

यामध्ये, व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका ‘सुषमा शिरोमणी’ व अभिनेता ‘भरत जाधव’ यांना घोषित करण्यात आला आहे. तसेच, राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक ‘वामन भोसले’ आणि जेष्ठ अभिनेते ‘परेश रावल’ यांना घोषित करण्यात आला आहे. या सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.