उत्तर प्रदेश : बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांचा ‘181 मतांनी’ पराभव

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या 181 मतांनी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्रिभुवन राम असे या बसपा उमेदवाराचे नाव आहे.

मच्छलीशहर मतदारसंघातून भाजपचे बीपी सरोज उभे होते. त्यांच्या विरोधात बसपचे त्रिभुवन राम उभे होते. भाजपचे बी. पी सरोज यांना 4 लाख 88 हजार 397 मते मिळाली तर बसपच्या त्रिभुवन राम यांना 4 लाख 88 हजार 216 मते मिळाली. म्हणजेच त्रिभुवन राम यांचा अवघ्या 181 मतांनी पराभव झाला. टक्केवारीत हे मताधिक्‍य अवघे 0.20 टक्के
इतके आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.