देहूरोड -देहूगाव विठ्ठलवाड़ी येथे एका दीड वर्षाच्या बालकाने पाणी समजून डिझेल पिल्याने त्याचा मृत्यू झाला. डिझेल पिल्यामुळे मुलाची तब्येत बिघडली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.
वेदांत गौतम गायकवाड ( वय 19 महिने, रा. विठ्ठलवाड़ी, देहूगाव) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेदांतने पाणी समजून डिझेल पिल्याने त्याच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु उपचारा दरम्यान वेदांतचा मृत्यू झाला.