फतेहपुर – उत्तरप्रदेशातील फतेहपुर येथे पुन्हा गंगा नदीत काल पुन्हा सहा प्रेते आढळून आली आहेत. रविवारी सकाळी ही प्रेते तिथे तरंगताना आढळून आल्याची माहिती फतेहपुरच्या तहसिलदाराने दिली.
या प्रेतांवर नंतर कोविड प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. ही प्रेते फारच कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. ही प्रेत खूप लांबून वाहून आली असण्याची शक्यता तहसिलदाराने व्यक्त केली आहे.
या आधी बलियाच्या उजियार, कुलहादिया, आणि भरौली गावाजवळही अशीच मोठ्या प्रमाणात प्रेते आढळून आली होती. तेथे त्यावेळी एकूण 52 मृतदेह सापडले होते. करोनामुळे मरण पावलेल्या गरीब घरांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांसाठीही त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने त्यांचे नातेवाईकच गंगेत ही प्रेते सोडून देत असल्याचे सांगितले जाते.