मुंबई – आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याती जुगलबंदी मागील काही दिवसांत पाहायला मिळाली. आता चंद्रकांत पाटील आणि आमदार रोहित पवार असा कलगीतुला रंगला आहे. पेट्रोल दरवाढीवरून रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दलं होते. केंद्राच्या बाजुनं प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडं बोट दाखवलं होतं. इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. पण जर राज्य सरकारला एवढं वाटत असेल तर त्यांनी पेट्रोलवरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. यावर रोहित पवारांनी खोचक टीका केली होती.
रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं की, 2014 च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या. तरी 2014 च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज 350% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा 32.90 रु तर राज्याचा 28.35 रु कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. अशी टीका रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि त्याचवेळी केंद्र सरकारवरही केली.
असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी ₹ ची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 31, 2021
दरम्यान राज्य सरकारनं शेजारच्या राज्यांमध्ये असलेले इंधनाचे दर पाहावे, त्यानुसार आपले दर कमी करावे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर रोहित पवारांनी तौक्तेच्या मदतीचा संदर्भ देत टोला लगावला होता. ते म्हणाले, शेजारच्या राज्यांना वादळात हजारो कोटींची मदत मिळते. तशी मदतही महाराष्ट्राला मिळत नाही, त्यामुळं हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे.