कौशांबी – उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील भाजप आमदाराच्या भाचीने लग्नाच्या एक दिवस आधी आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. लग्नानंतर तिने तिला व तिच्या पतीच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे हा धोका आपल्या आमदार मामा व भावापासून आहे. असा व्हिडिओ या दोघा पती-पत्नीने समाज माध्यमांमधून जारी केला आहे. आमदार लाल बहादूर असे भाजप आमदाराचे नाव आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, आमदाराच्या भाचीचे २४ मे रोजी लग्न होणार होते. मात्र भाचीला हे लग्न मान्य नव्हते तिचे अन्य् दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरणं होते. त्यामुळे हे प्रेमीयुगल लग्नाच्या आधल्या दिवशी घरातून पळून गेले. व कानपूरच्या आर्य समाज मंदिरात २८ मे रोजी लग्न केले. लग्नानंतर या प्रेमीयुगलांनी आपल्या जीवाला धोका आहे. इतकचं नाही तर आमच्यासोबत ऑनर किलिंग होऊ शकते त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्यात यावी अशी विनवणी त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. हा धोका आपल्याच आमदार मामा व भावाकडून असल्याचे या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलीचे लग्न सरकारी शाळेतील एका शिक्षकासोबत ठरलं होते. मात्र तिचे एका आठवी पास प्रियकरासोबत प्रेम होते. त्यातूनच या दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र लग्नानंतर मुलाच्या कुुटु्ंबीयांवर पोलिसांनी दबाव आणला. त्यामुळे प्रेमीयुगल घरी असता त्यांना पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्याचठिकाणी या दोघांनी हा व्हिडीओ बनवला आहे.
दुसरीकडे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून भाजपा आमदार लाल बहादूर यांनी या प्रकरणात हात वर केले आहे. हा व्हिडिओ बनावट असून मला याबाबत काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.
हे ही वाचा
दुर्दैवी ! लग्नात ‘सप्तपदी’ चालताना वधूचा मृत्यू; वराने घेतले नवरीच्या बहिणीसोबत फेरे
Pune | सोसायटीतील पाण्याच्या टाकीत आढळला तरुणाचा मृतदेह
दुकानमालकाने विनयभंग केल्यामुळे तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल