पुणे – निलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी एकाच्या कारवर शिवणे येथे गोळीबार करण्याची घटना घडली आहे. शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोडवर रविवारी रात्री पावणेदहा वाजता हा थरार रंगला होता. त्यात एक गोळी पाठीला लावून केदार भालशंकर जखमी झाला आहे.
याप्रकरणी केदार शहाजी भालशंकर (वय २४, रा. रामनगर, वारजे ) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन निलेश गायकवाड व त्याच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.