म्यानमारच्या लष्कर प्रमुखांवर अमेरिकेचे निर्बंध

वॉशिंग्टन – म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला बंड घडवून आणणाऱ्या व्यक्‍ती, संघटनांचे पदाधिकारी, लष्करी शासनातील अधिकारी आणि लष्कर प्रमुख जनरल लाइंग यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. म्यानमारमधील उठावाला जबाबदार असलेल्या लष्कराशी संबंधित असलेल्या 10 व्यक्ती आणि 3 संस्थांवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने बंदी जाहीर केली आहे. बंदी घातलेल्या 10 व्यक्‍तींमध्ये म्यानमार लष्कराचे कमांडर इन चीफ (सीआयसी) मिंग आंग लाइंग, उप-सीआयसी सोईन विन, प्रथम उपाध्यक्ष मिंट स्वी यांच्यासह राष्ट्रीय संरक्षण व सुरक्षा परिषदेचा भाग असलेल्या सहा जणांचा सहभाग आहे.

 याशिवाय लष्करी शासनाने मंत्री म्हणून नियुक्‍त केलेल्या अन्य चौघांवरही निर्बंध घातले गेले आहेत, असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या व्यक्ती आणि संस्थांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष मालकीची अमेरिकेतील सर्व मालमत्तांशी संपर्क तोडण्यात आला आहे.

म्यानमारला लागणाऱ्या संवेदनशील वस्तूंच्या निर्यातीवरही निर्बंध घातल्याची घोषणाही अमेरिकेने केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेले सरकार उखडून ताकण्याच्या कृतीला उत्तर म्हणून म्यानमारच्या संरक्षण, गृह मंत्रालय, सशस्त्र सेना आणि सुरक्षा दलाच्या मंत्रालयाला संवेदनशील वस्तूंच्या निर्यातीवरील निर्बंध लागू करीत आहे, असे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने म्हटले आहे.

म्यानमार लष्कराद्वारे चुकीची माहिती देणे सुरू ठेवले जात असल्याने लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व साहित्य आणि प्रोफाइलचे वितरण कमी केले जाणार आहे, असे फेसबुकने घोषित केले आहे. हे उपाय म्हणजे बंदी नाही परंतु म्यानमार लष्कराद्वारे तयार केलेल्या पोस्ट दिसण्याचे प्रमाण कमी केले जाणार आहे.

दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने 55 परदेशींसह 23,000 हून अधिक कैद्यांची शिक्षा माफ करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.