न्युयॉर्क :- स्पेनचा अव्वल टेनिसपटू कार्लोस अल्कराझ याने येथे सुरु असलेल्या अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याच्यासह रशियाच्या डॅनियल मेदवेदेवनेही उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अल्कराझने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हवर 6-3, 6-2, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली. आता त्याने अशीच आगेकूच कायम राखली तर त्याला अंतिम फेरीतही स्थान मिळेल यंदाच्या मोसमात दुसरी ग्रॅंडस्लॅम जिंकण्याची संधीची खरी करुन दाखवेल.
अन्य लढतीत रशियाच्या मेदवेदेव यानेही चमकदार खेळ करताना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव केला.
आता पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीचचा सामना यजमान अमेरिकेच्या बेन शेल्टनशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना कार्लोस अल्कराझ व डॅनियल मेदवेदेव यांच्यात खेळला जाणार आहे.