वॉशिंग्टन: अलास्काच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करणाऱ्या रशियाच्या टेहळणी विमानांना अमेरिकेच्या “नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड’च्या लढाऊ विमानांनी रोखल्याचे आज उघड झाले.
ही घटना 24 जून रोजी रात्रीच्या सुमारास झाली होती. अलियुटियन द्विपसमुहातील युनिमॅक बेटांपासून 50 मैलांपर्यंत रशियाची आयएल-38 विमाने येऊन पोहोचली होती. हा भाग अलास्काच्या हवाई क्षेत्रातयेतो. या क्षेत्रात रशियाची विमाने सुमारे चार तास होती. रडारवर या विमानांची दखल उत्तर अमेरिका हवाई हद्द संरक्षण विभागाने तातडीने घेतली आणि रशियाच्या विमानांना रोखण्यासाठी लढाऊ विमाने
तातडीने रवाना करण्यात आली.
अमेरिका आणि कॅनडाच्या हवाई हद्दीत शिरणाऱ्या रशियाच्या विमानांना तातडीने ओळख आणि हवाई हद्दीत शिरण्याचे कारणही विचारण्यात आले. त्यानंतर रशियाची विमाने माघारी फिरली, असे उत्तरअमेरिका हवाई संरक्षण विभागाने म्हटले आहे. गेल्या महिन्याभरात पाच वेळेस रशियाच्या विमानांनी हवाई हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असेही या विभागाने सांगितले.