चेंगदू: चीनने केलेल्या आदेशानुसार अमेरिकेने चीनमधील आपला चेंगदू येथील वाणिज्य दूतावास बंद केला आहे. अमेरिकेने चीनचा ह्युस्टन येथील दूतावास बंद करण्याचा आदेश दिला होता.
या संबंधात अमेरिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीन सरकारने आमचा चेंगदू येथील दूतावास बंद करण्याचा जो आदेश दिला तो निराशाजनक आहे, पण आता आम्ही तो दूतावास बंद करीत असून त्या भागातील आमचा संपर्क अमेरिकेच्या चीनमधील अन्य ठिकाणच्या कार्यालयांमधून सुरू राहील असे अमेरिकेने म्हटले आहे.
चेंगदु येथील ज्या भागात अमेरिकेचा दूतावास आहे त्या भागातील रस्ते चीन सरकारने आज सकाळपासूनच बंद करून टाकले असून ही इमारत तेथील प्रशासनाने अन्य लोकांना संपर्कासाठी पूर्ण बंद करून टाकली आहे. त्या इमारतीवर आता
चिनी ध्वज फडकवण्यात आला असून तेथील अमेरिकन ध्वज उतरवण्यात आला आहे. कालपासूनच या दूतावासातील सामान अन्यत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. वाहनांच्या एका ताफ्यातून तेथील अमेरिकन कर्मचाऱ्यांना अन्यत्र सुरक्षितपणे हलवण्यात आले.