Rishi Sunak on UK Election। ब्रिटिशचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान सुनक यांनी 10 ड्राऊनिंग स्ट्रीट याठिकाणाहून भर पावसात केलेल्या भाषणात या निवडणुकीची घोषणा केली. यूकेमध्ये ४ जूलै रोजी निवडणुका होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या तारखेबाबत चर्चा होत होती. त्यानंतर आपल्या कार्यालयाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तारीख जाहीर केली.
निवडणुकीमध्ये सुनक यांना मोठा धक्का बसणार ? Rishi Sunak on UK Election।
सध्या यूके प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. त्यात निवडणुकांची घोषणा करून ऋषी सुनक यांनी स्वतःला मोठे आव्हान दिले आहे. कारण, या निवडणुकीमध्ये सुनक यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीला पुन्हा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न कठीण असल्याचे मानले जात आहे.
आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ Rishi Sunak on UK Election।
ऋषी सुनक यांनी मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यूकेच्या लोकांना त्यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “ब्रिटनच्या लोकांना आपले भविष्य निवडण्याचा आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची वेळ आलीय. आर्थिक प्रगतीला वाढवायचं आहे की पुन्हा पूर्वीच्याच स्तरावर जायचंय याबाबत लोकांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते, सुनक यांचा पक्ष सध्या विरोधी लेबर पार्टीपेक्षा खूप मागे आहे. याशिवाय सुनक यांचे कंझर्व्हेटिव्ह पक्षावरील नियंत्रण सुटलेले आहे. ते पुन्हा स्थापित करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. सुनक हे आठ वर्षामधील पाचवे पंतप्रधान आहेत. त्यांनी लिज ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये पदाची शपथ घेतली होती. लिझ ट्रस हे केवळ ४४ दिवस सत्तेत होते.