चेन्नई – लेजण्ड्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याला सलग सहाव्या पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. या फेरीत त्याला रशियाच्या नेपोमीन नियात्शी याच्याकडून 3-2 असा पराभव पत्करावा लागला.
पाचव्या फेरीत त्याचा हंगेरीच्या पीटर लेको याने 3-2 असे पराभूत केले. चौथ्या फेरीत आनंदचा नेदरलॅंडच्या अनीश गिरी याने 3-2 असा पराभव केला होता. तिसऱ्या फेरीच्या सामन्यात रशियाच्या व्लादीमिर क्रामनिक याने आनंदवर 2.5-0.5 असा सहज विजय मिळवला. पहिल्या फेरीत आनंदचा रशियाच्या पीटर स्विडलरने 2.5-1.5 असा पराभव केला. तर, दुसऱ्या फेरीत मॅग्नस कार्लसनने आनंदवर 2.5-1.5 अशी मात केली.