मुंबई – कन्नड अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा’ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर असाक्षरशः राज्य केले. भारतासह जगभरात कांताराने जबरदस्त कमाई केली.हा चित्रपट 2022 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला. ‘कांतारा’ चित्रपटाने अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला देशभरात रातोरात स्टार बनवले. यानंतर ऋषभ शेट्टीने कांतारा 2 ची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांना मोठा आनंद झाला. अशात यामध्ये आता नवीन चेहरे कोणते येणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असताना याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
कांताराच्या दुसऱ्या पार्टमधे अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एंट्री झाली आहे. एकीकडे दुसरा भाग हा सिक्वल नसून प्रीक्वल असणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. अशात उर्वशीची या चित्रपटात एंट्री झाल्याने चाहते भलतेच खुश झाले आहेत. उर्वशीने याबाबत एक इंस्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे.
उर्वशी रौतेला आणि फॅशन हे समीकरण नेहमीच चर्चेत असत. कधी हिजाब प्रकरणी वक्तव्य केलं म्हणून उर्वशी चर्चेत येते तर कधी क्रिकेटरसोबतच्या गॉसिपमुळे उर्वशी चर्चांमध्ये असते. आता मात्र थेट कांतारामध्ये एंट्री झाल्याने उर्वशी चांगलीच चर्चेत आली आहे. कांतारा 2 लोडींग अशा आशयाची इंस्टाग्राम पोस्ट उर्वशीने केली आहे. यावेळी उर्वशीने ऋषभ शेट्टी सोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
ऋषभने केला होता खुलासा
कांतारा 2’ 2024 साली प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ऋषभने सांगितले होते की, ‘कांतारा 2’ हा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षांपूर्वीची असणार आहे. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कांताराने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.