Siddharth Bodke| ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडे काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत विवाह बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांनी कामास पुन्हा सुरुवात केली आहे. लवकरच सिद्धार्थ बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार आहे. नुकताच त्याचा शूटींगदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत सिद्धार्थ नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील शिव तांडव डान्सच्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये सिद्धार्थ एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. कपाळाला भस्म, हातात भलामोठा शंख सिद्धार्थने घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, लग्नाआधी सिद्धार्थने उर्वशीसह एक फोटो शेअर केला होता. ज्याला त्याने कॅप्शन दिलं होतं, “स्टे ट्यून.” या फोटोवर उर्वशीने “दुल्हे राजा” अशी कमेंट केली होती. Siddharth Bodke|
View this post on Instagram
अभिनेता सिद्धार्थ बोडकेने याआधी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘दृशम 2’ चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. अभिनेता सिद्धार्थ बोडके -तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्येही झळकला होता. Siddharth Bodke|