उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला बाय बाय

मुंबई: काही महिन्यांपूर्वीच काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला  कंटाऴल्याने त्यांनी हा राजीनामा दिला असल्याच बोलल जात आहे.

‘पक्षाच्या हितासाठी काही संघटनात्मक बदल करणे आवश्यक आहे. मात्र पक्षाचे स्थानिक नेतृत्व त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहेत. किंवा त्यांच्या हातात काही राहील नाही. त्यामुळे पक्षात जागा अडवून बसण्यापेक्षा बाहेर पडलेलं बर’. असं मत उर्मिला यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. बॉलिव़ू़डमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात. तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. मी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. असं मत त्यांनी प्रवेशदरम्यान केलं होत.

मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाला एक पत्र पाठवले होते. त्या पत्राची काहीच दाखल घेतली नसल्याने देखील त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. तसेच पक्षांतर्गत सुरु असणारे राजकारण याला कंटाळल्याने त्यांनी हा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)