नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दिल्लीत भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे जागा वाटप तसेच आघाडीमध्ये मनसेचा प्रवेश या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एव्हीएम मशिनविरोधातील राज्यव्यापी आंदोलनाचाही विषय या भेटीमध्ये होण्याची शक्यता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
Delhi: Nationalist Congress Party (NCP) Chief Sharad Pawar reaches the residence of Congress interim president Sonia Gandhi, to meet her. (file pics) pic.twitter.com/sB5Iui5mPf
— ANI (@ANI) September 10, 2019
सोनिया यांच्या दिल्लीतील १० जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या दोघांमध्ये गेल्या ४५ मिनिटांपेक्षा जास्त काळ चर्चा सुरु होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाची साथ सोडून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणूक, रणनीती या दोन्हींबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.