मुंबई – आपल्या अतरंगी फॅशनसाठी अभिनेत्री उर्फी जावेद प्रसिद्ध आहे.चर्चेत राहण्यासाठी उर्फी मीडियासमोर आगळ्या वेगळ्या पोशाखात वावरते आणि नेहमीच ट्रोल होते. परंतु यामुळेच दिवसेंदिवस उर्फीचे फॅन फॉलोविंग चांगलेच वाढताना दिसत आहे. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारणही तसंच आहे. उर्फीला तिच्या कपड्यांवरून थेट हिंदुस्तानी भाऊनेच इशारा दिला आहे.
विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊने उर्फीला एका व्हिडिओच्या माध्यमातून फॅशनच्या नावाखाली सुरु केलेले प्रकार बंद करण्याचा इशारा दिला आहे. उर्फीने देखील यानंतर हिंदुस्तानी भाऊला उत्तर दिले आहे. आपल्या व्हिडिओत हिंदुस्तानी भाऊ म्हणतो, जय हिंद हा मेसेज आहे उर्फी जावेदसाठी जी स्वतःला आज खूप मोठी फॅशन डिझायनर समजते. बेटा तू ज्याप्रकारचे कपडे घालून फिरत आहेस,तो हिंदुस्तानचा रिवाज नाही. ही संस्कृती नाही तुझ्या या प्रकारामुळे महिलांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. लवकर सुधर नाहीतर मी सुधारेल असा इशारा हिंदुस्तानी भाऊने यावेळी दिला आहे.
View this post on Instagram
उर्फीने देखील हिंदुस्तानी भाऊच्या या धमकीवजा इशाऱ्याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. उर्फीने हिंदुस्तानी भाऊचाच एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो स्वतः कोणी काय घालावे हा त्याचा प्रश्न असल्याचे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर उर्फीने “प्रसिद्धीसाठी हपापलेले असे लोक काहीही करू शकतात”असे म्हणत ३ महिन्यांपूर्वी भाऊला आपल्या कपड्याबद्दल काहीही आक्षेप नव्हता मग आता तो केवळ प्रसिद्धीसाठी हे बोलत असल्याचे म्हंटले आहे.