मुबई – अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोन्हही स्टार्स वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताहेत. यावेळी सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान एक चाहती स्टेज जवळच चक्कर आल्याचा प्रकार घडला. वरुणच्या हे लक्षात येताच त्याने स्टेजवरून खाली उतरत मदत केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.व्हिडिओमध्ये वरुण धवन एका आजारी मुलीजवळ बसून तिला पाणी देताना दिसत आहे. यादरम्यान तेथे मोठी गर्दी दिसून येते. अभिनेत्री क्रिती सेनॉन इतर अनेकांसोबत स्टेजवर उभी असलेली दिसत आहे.आजारी असल्याने या तरुणीला चक्कर आल्याचे समोर आले. वरुणने तिला मदत केल्याचे पाहताच चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.
A fan fell sick, during the college event yesterday and varun taking care of that girl🥺#VarunDhawan #KritiSanon #Bhediya pic.twitter.com/mUHaHiXLr3
— annesha.🐺 (@ApnaaVarun) November 13, 2022
भेडिया हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. वरुण आणि क्रितीशिवाय या चित्रपटात दीपक डोबरियाल, अभिनय राज आणि भावेश लोहार हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.