मुंबई – बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झालेली स्पर्धक उर्फी जावेद आपल्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचे रोज एकापेक्षा एक धाडसी लूक सोशल मीडियावर बघायला मिळतात. यावेळी मात्र उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात धाडसी लूक बघायला मिळाला आहे. उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती टॉपलेस आहे. तिचा हा जुना व्हिडिओ आहे, जो तिने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
या नवीन फोटोमध्ये उर्फी गुलाबी रंगाच्या क्युट ड्रेसमध्ये दिसून आली. या स्ट्रिंग्ड स्ट्रॅप ड्रेसला समोर कट आउट होता. त्याचवेळी हा ड्रेस मागून बॅकलेस होता. उर्फी जावेदने या शॉर्ट ड्रेससोबत लाइट ब्राऊन कलरची हाय हिल्स घातली होती.
View this post on Instagram
उर्फीने तिचे केस उंच अंबाड्यात बांधले आहेत. यासोबत तिने ओस मेकअप केला होता. पापाराझीशी बोलताना उर्फी जावेदने सांगितले की ती डाएट करत नाही. उर्फी वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती.
View this post on Instagram
उर्फी जावेदच्या या लूकची बरीच चर्चा आहे. तिने इन्स्टास्टोरीवर रेस्टॉरंटमधील तिचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फी हातात कॉकटेल ड्रिंक घेऊन आनंदाने पोज देताना दिसत आहे. आता उर्फीच्या या फोटोवरून तिला सोशल मीडिया चांगलेच ट्रोल केले जात आहे. यूजर्स तिच्या ड्रेसवर कमेंट करत आहेत.