मुंबई – इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. मुंबईच्या रस्त्यांवर ती रोज नव्या अवतारात पाहायला मिळते. तिच्या बोल्ड स्टाइलसाठी लोकप्रिय असलेली उर्फी प्रत्येक वेळी तिच्या कपड्यांवर प्रयोग करत असते. अभिनेत्री दररोज तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. अशाच काही अतरंगी स्टाईलचे काही फोटो सध्या उर्फीने शेअर केले आहेत.
उर्फीचा आणखी एक एक्सट्रा ऑर्डीनरी हटके नवा अवतार सोशल मीडियावर दिसला आहे. उर्फी पुन्हा एकदा विचित्र स्टाईलमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय. उर्फीने यावेळी थेट छोट्या छोट्या रंगीत दगडांचा ड्रेस घातल्याचे पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दगडांनी बनवलेला मिनी स्कर्ट आणि ब्रॅलेट परिधान केलेली उर्फी खूपच बोल्ड दिसत आहे.उर्फीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला एका कमेंटचा स्क्रीनशॉटही दिसत आहे, स्क्रिन शॉर्टमध्ये तिला दगड मारावा’ अशी एका चाहत्यांची कमेंट दिसते. त्यामुळेच उर्फीने तिच्या कपड्यांवर प्रयोग केल्याचे समजते. चाहत्याने मारलेल्या दगडातून ड्रेस बनवल्याचा सूतोवाच यावेळी उर्फीने या व्हिडिओतून केला आहे.