उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये उन्नावचीच पुनरावृत्ती

14 वर्षाच्या मुलीला बलात्कार करून पेटवून दिले
90 टक्के भाजलेल्या मुलीवर कानपूरमध्ये उपचार सुरू

बांदा (उत्तर प्रदेश) : अलिकडेच झालेल्या उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एका गावात झाली आहे. 18 वर्षीय एका मुलीवर बलात्कार करून तिला पेटवून देण्यात आले. ही मुलगी 90 टक्के भाजली असून तिच्यावर कानपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बलात्कार आणि हल्ला करणारा 22 वर्षीय आरोपी हा संबंधित पीडीत मुलीचा नातेवाईक आहे. हुशंगाबाद पोलिस ठायाच्या हद्दीतील गावत घरी एकटी असताना त्याने या मुलीवर बलात्कार केला आणि तिला पेटवून दिले, असे परिमंडळ अधिकारी कपिल देव मिश्रा यांनी सांगितले.

मुलीच्या ओरडण्याच आवाज ऐकल्यावर शेजारी आणि नातेवाईकांनी तिला स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये नेले. तेथून तिला कानपूर येथेल रुगालयात हलवण्यात आले. या मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात “एफआयआर’ नोंदवण्यात आली. तसेच त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, असे प्राथमिक तपासामध्ये उघड झाले आहे.

पूर्वी घडलेल्या एका घटनेसंदर्भात शुक्रवारी दोन्ही कुटुंबांदरम्यान पंचायत आयोजित केली गेली होती. लग्नाबाबत तडजोडीने निर्णयही घेतला गेला होता, आता या बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात उन्नावमधील एका बलात्कार पीडीत युवतीला पाच जणांनी पेटवून दिले होते. या पाचही जणांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. तर जखमी तरुणी दिल्लीतील रुग्णालयात उपचारादर्म्यान मरण पावली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)